पंतप्रधानांचा शिक्षकांशी ऑनलाईन संवाद

पंतप्रधानांचा शिक्षकांशी ऑनलाईन संवाद

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

केंद्रीय शिक्षण मंत्रालय ( Union Ministry of Education )यावर्षी 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरदरम्यान शिक्षक महोत्सव -2021 ( Teachers Festival-2021 )साजरा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून या महोत्सवाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास नाशिकच्या तोफखाना केंद्रीय विद्यालयाच्या सर्व शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. विद्यांजली, निपुण भारत, आजादी का अमृत महोत्सव, एक भारत- श्रेष्ठ भारत इत्यादी उपक्रमाच्या सुंदर अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन ही दिले.

टोकियो ऑलिंपिक 2020 मधील विजेत्या खेळाडुंना कमीत कमी 75 शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे सांगितले.

यावेळी तोफखाना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्रकुमार ओलावत, मुख्याध्यापिका सुभद्रा नायर आदींसह सर्व शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com