
नाशिक । प्रतिनिधी Nashik
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (सीपीसीबी) पुणे क्षेत्रीय कार्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. निश्चल शेट्टी, डॉ. गितांजली कौशीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी शपथ घेण्यात आली.
केंद्र सरकारकडून पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मोहीम (मिशन लाईफ - लाईफस्टाईल फॉर एनव्हायरॉनमेंट) राबविली जात आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे जनजागृतीसाठी शपथ देण्यात आली.
सुरुवातीला डॉ. निश्चल शेट्टी यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी आपण दैनंदीन जीवनात कसे बदल करायला हवेत याबद्दल माहिती दिली. नागरिकांचे पर्यावरणपूरक सवयी आणि व्यवहार असायला हवेत याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित मनपा अधिकारी, कर्मचा-यांना शपथ दिली.
मुख्यालयातील स्वागत कक्षाजवळ झालेल्या कार्यक्रमासाठी उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त करुणा डहाळे, सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता गणेश मैड, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, उपअभियंता नितीन धामणे, उपअभियंता संजय कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.