राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू निवड

उगाव । वार्ताहर | Ugav

राज्यस्तरीय टेनिस, क्रिकेट स्पर्धेसाठी (State Level Tennis, Cricket Tournament) विराज चौधरी, दक्ष गायकवाड, श्लोक कुलकर्णी तसेच इतर खेळाडूंची निवड (Selection of players) करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Tennis Cricket Association) व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन (Nashik Tennis Cricket Association) आयोजित जिल्हास्तरीय 14 वर्षाआतील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा (Tennis Cricket Championship Tournament) व निवड चाचणी दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक (Datta Mogre Stadium Nashik) येथे संपन्न झाली.

शिव अविष्कार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या (Shiv Avishkar Sports Foundation) खेळाडूंची विराज चौधरी, दक्ष गायकवाड आणि श्लोक कुलकर्णी या खेळाडूंची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये (State Level Tennis, Cricket Tournament) निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा व तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 50 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड (Nashik District Secretary Vilas Gaikwad), सहसचिव धनंजय लोखंडे उपस्थित होते.

नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेटचे सचिव विलास गायकवाड यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाडूंची माहिती व नियम सांगितले. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल निफाड नगराध्यक्ष अनिल कुंदे, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद गायकवाड, पत्रकार राहुल कुलकर्णी, नगरसेवक संदिप जेऊघाले, देवदत्त कापसे, शाम चौधरी, अविनाश बागडे, नितिन तांबे, नितीन आहेर, पप्पु चौधरी, शुभम व्यवहारे, यश राऊत, सुयश कुंभार्डे, प्रतिक बाफणा आदींनी अभिनंदन केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com