भुसावळ, मनमाडसह इगतपुरी स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु

तिकीट दर दहा रुपये
भुसावळ, मनमाडसह इगतपुरी स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट सुरु


नाशिकरोड | Nashik
भुसावळ रेल्वे मंडळामधील मनमाड, इगतपुरीसह सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

करोनाच्या महामारीमुळे भुसावळ विभागातील नाशिकरोडसह काही नामांकित स्थानकांवरच प्लॅटफॉर्म तिकीट सुरु केले होते.

प्रवाशांच्या सोयीसाठी आता रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटची सुविधा 11 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असेल. प्रवाशांना सोडण्यास आलेल्यांना हे तिकीट घेऊनच स्थानकात प्रवेश करावा लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com