
नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), गोदावरी गटारीकरण विरोधी मंच (Godavari Gatarikaran virodhi manch) व जिंदाल फिल्म पॉलिस्टर (Jindal Poly Films) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Darna dam water shed) असलेल्या परिसरात प्लास्टिक मुक्त दारणा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साचलेला एकल वापर (single use) प्लास्टिक कचऱ्याची स्वच्छता करून जिंदाल कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचे साहित्य व कर्मचारी यांची उपलब्धता करून देत सर्व परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला....
पावसाळ्यात पाण्याचा साठा (water storage) तयार झाल्यावर साचलेले प्लास्टिक वाहत जावून आजू बाजूच्या खेड्यात शेत जमिनीत साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही अडचण लक्षात घेवून प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्लास्टिक मुक्त अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
यापुढे औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपनी प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने असे उपक्रम सातत्याने राबविले जातील असा विश्वास गोदावरी गटारी करण विरोधी मंचाचे निशिकांत पगारे (Nishikant Pagare) यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळें जिंदाल फिल्म पॉलिस्टरचे संजीव सक्सेना, निशिकांत पगारे, योगेश बर्वे, डॉ अजय कापडणीस, क्षेत्र अधिकारी संजीव रेदासनी, राजेंद्र सूर्यवंशी, संतोष मोहरे, नितीन चौधरी, शांतीलाल नागरे, अनिकेत चौधरी, संजय गवळी, स्वप्नील खांगटे, गणेश दवांडे, राजेश पटेल, मिहिर पांडा, समीर कुलकर्णी व कर्मचारी आदीनीं स्वच्छतेसाठी सहभाग घेतला.