ब्रह्मगिरी, गंगाद्वार येथून प्लास्टिक संकलन

ब्रह्मगिरी, गंगाद्वार येथून प्लास्टिक संकलन

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी व नाशिक परिसरात पुरातन गड-किल्ले व पर्यावरणाच्या सुरक्षेच्या हेतूने वृक्षारोपण व त्याचे जतन संवर्धन त्याचबरोबर जंगल वनव्यापासून वाचवण्यासाठी अविरतपणे काम करणारी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने ( Swarajya Sanvardhan Bahuudeshiya sanstha ) पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत व गंगाद्वार ( Brahmagiri, Gangadwar) ह्या ठिकाणीचा परीसर प्लास्टिक( Plastic ) मुक्त केला.

भल्या पहाटे सुरू झालेल्या या उपक्रमात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बॉटल, तुटलेले चप्पल, जेवणाची पॅकेट अशा प्रकारचा एक ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा गोळा करून स्थानिक नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी एस एस गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला. लॉकडाऊन असुनही एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा सापडल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

या उपक्रमात हरीत ब्रह्मगिरी व त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्थ श्रीमती ललिता शिंदे यांचे मार्गदर्शन संस्थेला फार मोलाचे ठरले, त्यामुळे यांचे बेलाचे वृक्ष देऊन आभार व्यक्त करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत दिंडोरी तालुक्या सह नाशिक शहरातील ही सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत मोहीम पूर्णत्वास नेली.

यावेळी भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, प्रवीण सोमवंशी, दत्तू भेरे, बाळनाथ जाधव, प्रवीण भेरे, रामदास बुरकुल, महादेव खिल्लारे, अमोल शिरसाट, नितीन ठाकरे, पंकज ठाकरे, दिलीप सोनवणे, अमोल घोलप, शरद वडजे, स्वप्नील जाधव, जयेश जाधव, आशिष घोलप, गणेश घोलप, राहुल डमाळे, भास्कर घोलप, नाना सातपुते, अण्णा चव्हाण, संपत ठाकरे, सुयेशा चव्हाणके, रुद्राक्ष चव्हाणके, शंभू जाधव, सोहम सोनवणे आदींनी सहभाग नोंदवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com