नाशिक । Nashik

केरळच्या तिरुअंनतपुरम येथून नाशिकला देण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी मशीन तांत्रिक बिघाडामुळे परत पाठविण्यात आल्यानंतर एक महिन्यांनी नवीन मशीन उपलब्ध झाली. मात्र, अद्याप आयसीएमआरकडे प्लाझ्मा थेरपीला परवानगी मिळणे बाकी आहे...

परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीला सुरुवात केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

देशातील मोझक्या शहरात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जात आहे. जिल्हाप्रशासनाने या थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानूसार १६ जुलैला केरळहून जिल्ह्यासाठी मशीन उपलब्ध करुन देण्यात आली.

पण तिच्यात तांत्रिक बिघाड लक्षात आल्यावर तात्काळ याबाबतचा अहवाल पाठवून मशीन परत पाठविण्यात आले. त्यानंतर १७ आॅगस्टला नवीन प्लाझ्मा थेरपी जिल्ह्याला देण्यात आले.

त्यानंतर जराही दिवस वाया न घालवता दुसर्या दिवशी प्लाझ्मा थेरपी मशीन कार्यन्वित करण्यात आली. त्यानंतर तत्काळ एफडिआयकडे अहवाल पाठविण्यात आला व २७ आॅगस्टला 'आयसीएमआर'कडे थेरपीद्वारे उपचाराला परवानगीची मागणी करण्यात आली.

डाॅ.गांगुर्डे परवानगीसाठी फ्लाॅलोअप घेत आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जातील असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. तसेच या थेरपीसाठी काहि निकष पूर्ण करावे लागतील.

त्यात प्लाझ्मा देणारी व्यक्ती ही करोना उपचार घेऊन बरी झालेली असावी. डोनेट करणारी व्यक्तीला इतर कोणताही आजार नसावा व अशा व्यक्ती स्व:ताहून पुढे येणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकार्यांनि सांगितले.