प्लाझमा दात्यांमुळे ३५ जणांना जीवनदान

प्लाझमा दात्यांमुळे ३५ जणांना जीवनदान
USER

सातपूर | Satpur

महामारीच्या काळात रुग्णांना उपयुक्त ठरणारा प्लाजमा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक बिझनेस असोसिएशन च्या काही सदस्यांनी प्लाझमा बँक तयार करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शंभर प्लाझमा दात्यांच्या मदतीने, 30-35 रुग्णांना जिवनदान मिळाल्याचे समाधान या प्रकल्पाचे संयोजक तुषार श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

युनायटेड फोर ग्रोथ या संकल्पनेवर उभारलेल्या नाशिक बिझनेस असोसिएशनचे तुषार श्रीवास्तव व उमेश शिंदे यांच्या पुढाकाराने प्लाझमा बँक तयार करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली जात आहे. आत्तापर्यंत दोन हजाराहून जास्त लोकांनी संपर्क साधलेला आहे. त्यातून 100 जणांनी दिलेल्या प्लाझमाच्या माध्यमातून 35 रुग्णांचा योग्यवेळी मोलाची मदत मिळाल्याने त्यांना जिवनदान मिळाल्याचा आनंद टीमने व्यक्त केला.

प्लाझमा दात्यांमध्ये अज्ञान

कोविडवर उपचार घेतल्यानंतर 14 दिवस रुग्णालयातीलरुग्णालयातील व त्या नंतरचे 28 दिवस असे 45 आजाराला झाल्यानंतर प्लाझमा दानासाठी 18 ते 24 वयोगटातील व्यक्ती पात्र ठरते.

दर 15 दिवसांनी प्लाझमा दान करता येतो. मात्र यासाठी महिला तसेच डायबिटीज व ब्लडप्रेशर असलेली व्यक्ती पात्र ठरु शकत नाहीत. जमा झालेला प्लाझमा 6 महीने वापरास उपयुक्त राहत असल्याचे तुषार श्रीवास्तव यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com