रक्तदान शिबिरात १० जणांकडून प्लाझ्मा दान

रक्तदान शिबिरात १० जणांकडून प्लाझ्मा दान

६५ पिशव्या रक्तही संकलित

नवीन नाशिक | Nashik

करोनाने नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना जीवनदान द्यायचे असेल तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान आणि प्लाज़्मादानासारख्या राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक तथा शिवसेनामहानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.

नवश्या मारुती मित्र मंडळ त्रिमुर्ती चौक तर्फे आयोजित रक्तदान व प्लाज़्मादान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी बडगुजर बोलत होते. यावेळी आयोजित शिबिरात 65 पिशव्या रक्त संकलित झाले तर दहा जणांनी प्लाज़्मादान केले. यावेळी प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्धाटन झाले.

यावेळी आयुक्त जाधव यांनी बडगुजर यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन नाशकात त्यांनी उभारलेले कोविड़ केअर सेंटर हे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडविते असे सांगून रक्तदान आणि प्लाज़्मादानाने आपण अनेक लोकांचे प्राण वाचू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची शिबिरे ठीकठिकाणी झाली पाहिजेत असेही सांगितले.

यावेळी राहुल शिंदे, अभिजीत सुर्यवंशी, पवन मटाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीततेसाठी मंडळाचे पदाधिकारी आदित्य परिहार, ऋषिकेश भालेराव, अभिजीत ढवळे, अर्थव जोशी, दुर्गेश ढवळे, अमेय जोशी, विनित पंडीत, नितेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com