कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ३०० पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ३०० पर्यावरण पूरक वृक्षांची  लागवड

देवळाली कॅम्प | Deolali Camp

जागतिक पर्यावरण दिना निमित्त कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने वॉटर फिल्टरेशन प्लांट सह टेंचिंग ग्राउंड भागात पर्यावरण पूरक व फळझाडांची ३०० वृक्ष लागवड करण्यात आली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रेगेडिअर ए.रागेश, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, कार्यालयीन अधिक्षक उमेश गोरवाडकर, अभियंता विलास पाटील,

आरोग्य उपअधीक्षक अमन गुप्ता, पाणीपुरवठा अभियंता विभागाचे स्वप्नील क्षत्रिय, विवेक बंड, मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, नलिनी लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य उपअधीक्षक अमन गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अतुल मुंडे व सुपरवायझर धीरज डुलगज व कर्मचारी प्रयत्नशील होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com