
नाशिक | प्रतिनिधी
सातपुर शिवाजीनगर येथील देवराई (Deorai) लगत तयार करण्यात आलेल्या आमराई क्षेत्रात १६० वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांच्या रोपांची (Mango Tree Plantation) लागवड करण्यात आली आहे. तर सलग दोन दिवसांत सुमारे २ हजार ५०० झाडांची लागवड करण्यात आली...
पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबणारे शेखर गोयकवाड (Shekhar Gaikwad) यांच्या प्रयत्नांतून फाशिचा डोंगर परिसरात देवराई फुलवत हिरवळ पसरवली आहे. त्यामुळे या भागात जैवविविधता जोपसली जात असून विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच या भागात मोरांचे प्रमाणहैी मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.
जागतीक पर्यावरण (Environment Day) दिवसानिमित्त या परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नगरसेवक दिनकर पाटील,माजी नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली गाडे, वन विभागाचे कर्मचारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत आमराई येथे विविध जातीच्या आंब्याच्या १६० रोपांची लागवड करण्यात आली.
दोन एकराच्या क्षेत्रातील ही आमराई फुलवली जाणार असून या परिसरात आणखी आंब्यांच्या जातींचा शोध घेतलेला आहे. त्यांची रोपे तयार करुन पूढील वृक्षारोपण कार्यक्रमात त्यांची लागवड केली जाणार असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.
या उपक्रमात विविध संस्था,औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कामगारांचे समुह, कॉलेजचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी व पर्यावरण प्रेमी नागरिक असे सुमारे ७०० ते ८०० नागरीकांनी विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड केली त्यात प्रामुख्याने कळम, जंगली आजम, पाडळ, मोई, कोंदण, आकृण, फायर, कुंकू, लोकंडी आदींसह विविध ४० जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
दरम्यान, दिवसभरात १५०० झाडांची लागवड (Plantation of trees) करण्यात आली. सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी क हजार तर दूसर्या दिवशी दिड हजार रोपांची लागवड करण्यात आली.