पतीच्या तेराव्याचा खर्च टाळून लावले ४४ कडुलिंबाची झाडं

पतीच्या तेराव्याचा खर्च टाळून लावले ४४ कडुलिंबाची झाडं

नवीन नाशिक । प्रतिनिधी

करोनात ऑक्सिजन पातळी अधिक खालावल्याने पतीचा ४४ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला . मृत्यूचे दुःख पेलत पत्नीने १३ व्या चा खर्च टाळत कडुलिंबाचे एकूण ४४ रोपे लावून एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे .

प्रीतिश परदेशी ( वय ४४ ) रा . नवीन नाशिक यांचे नुकतेच करोनाच्या आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे . करोना आजारात अचानक ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला . यामुळे परदेशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला .

तेराव्याचा खर्च बाजूला सारत त्यांच्या कुटुंबीयांनी पाटील नगर येथील संत गाडगे महाराज उद्यानात त्यांच्या स्मरणार्थ ४४ कडुलिंबाचे रोपे लावत एक आदर्श प्रस्थापित केला . यावेळी पत्नी भारती परदेशी , मुली श्वेता व प्रितुंचा तसेच परदेशी परिवारातील सदस्य उपस्थित होते .

करोना आजारात पतीचा ४४ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला . पतीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाचा खर्च बाजूला ठेवून एकूण ४४ कडुलिंबाची रोपे लावली . याचे समाधान आहे . हा उपक्रम सर्वांनीच करणे गरजेचे आहे .

भारती परदेशी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com