
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
नाशिक (nashik) मार्गावरील मोहदरी घाटात (Mohdari Ghat) रस्त्याच्या कडेला सध्या कचर्याचे साम्राज्य बघायला मिळत असून हा कचरा साफ करत वनविभागाच्या (Forest Department) मोकळ्या जागेत वृक्षलागवड करण्याची मागणी (Demand for tree planting) निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.
मोहदरी घाटालगत माळेगाव (malegaon) एमआयडीसी परिसर (MIDC area) असल्याने अनेक छोटे कारखाने आपला कचरा या भागात आणून टाकत असतात. तसेच घाट चढताना अनेक अवजड वाहने नादुरुस्त होत असल्याने वाहनांतील माल घाटात टाकून देत पळ काढतात. त्यामुळे घाटातून सिन्नरकडे (sinnar) येताना महामार्गाच्या (Highway) कडेला कचरा पडलेला आढळून येतोय.
पावसाचे पाणी (rain water) वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या नाल्यांमध्येही दगड, मुरुम, माती, राख, धान्य, कपडे, काचा पडलेल्या असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासही अडसर निर्माण होणार असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. घाटाच्या आजूबाजूस वनविभागाच्या मालकीची मोठी जागा पडीत असून झाडांच्या अभावी हा पूर्ण परिसर ओसाड बनला आहे.
त्यामुळे या ठिकाणी मद्यपींचे अड्डेही वाढत असून त्याला आवर घालण्यासाठी, घाटाचे सौदंर्य वाढवण्यासाठी अशा रिकाम्या जागेंवर वनविभागाने झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.