पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण करा; शिवबा ट्रेकर्सचे तरुणाईला आवाहन

पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण करा; शिवबा ट्रेकर्सचे तरुणाईला आवाहन

ओझर । वार्ताहर | Ozar

वृक्षतोडी (Deforestation) मुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्याचा परिणाम आज सर्वत्र दिसत आहे.

त्यासाठी आपण निसर्गाचे काही देणे लागतो अशा विचारातून पर्यावरणाचा (environment) समतोल राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण (tree plantation) करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन ओझर (ozar) येथील निसर्गप्रेमी असलेल्या शिवबा ट्रेकर्स (Shivba Trekkers) समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी त्यांनी सोशल मीडियाद्वारे (social media) तरुणाईला साद घालत नुसतं काय झाडी, काय डोंगार.. बोलू नका निसर्गासाठी योगदान द्या... अशी पोस्ट व्हायरल करत वृक्षसंवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवडीसाठी तरुणांना प्रोत्साहित केले आहे. ओझर येथील शिवबा ट्रेकर्स निसर्ग संवर्धनासाठी वर्षभर ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवित असतो. याही वर्षी शिवबा ट्रेकर्सच्या वतीने विविध वृक्षांच्या बीजांचे रोपण करण्यात आले.

वृक्ष बियांमध्ये प्रामुख्याने बोर, आंबट चिंच, पपई, बकुळ, हिरडा, बेहडा, बिंबा, खैर, आपटा, करवंदपळस, पेरू, रिठा, आंबा, काटेरी साबर यांसह विविध वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले. शिवबा ट्रेकर्सच्या वतीने चालू वर्षी तब्बल 15 लाख बियांचे रोपण करण्याचा महासंकल्प आहे. त्यानुसार या बीजरोपनास कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र वणी येथून जवळच असलेल्या आणि समुद्रसपाटीपासून 1300 मीटर उंच असलेल्या मोहनदर किल्ल्यावर बिजारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवबा ट्रेकर्सच्या वतीने नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी (tree plantation) योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्याच्या परिणाम आज सर्वत्र दिसत आहे. त्यासाठी आपण निसर्गाचे काही देणे लागतो अशा विचारातून पर्यावरणाचा (environment) समतोल राखण्यासाठी नागरिकांनी बीज रोपण, वृक्षारोपण करावे असे आवाहन शिवबा ट्रेकर्सच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी शिवबा ट्रेकर्सचे संस्थापक अच्युत आढाव, निफाड कृषी अधिकारी सुभाष वाकचौरे, डॉ.विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकवाड, संतोष जाधव, पंकज थोरात, विशाल आहिरे, सचिन चौधरी, कृष्णा आढाव, प्रा.चंद्रशेखर मोरे, एच.ए.एल चे तुषार पाटील, संदीप घुमरे, कैलास भेरड, भूषण कदम, प्रवीण जाधव, नितीन जाधव, पूर्णिमा त्रिपाठी, शौर्य थोरात, आदित्य विसपुते आदींसह सदस्य उपस्थित होते.

बिजारोपणाच्या या मोहिमेत निसर्ग प्रेमी असलेल्या काही लहान मुलांनी देखील सहभाग नोंदवल्याने येणार्‍या नवीन पिढीलाही निसर्ग संवर्धनाचा शुभ संदेश जात असल्याने शिवबा ट्रेकर्सच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com