ईएसआयसी चे नियोजन महामंडळाकडे ठेवावे : खा. गोडसे

ईएसआयसी चे नियोजन महामंडळाकडे ठेवावे : खा. गोडसे

सातपूर । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कमतरतेची खा. हेमंत गोडसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी खा. गोडसे यांनी आज राज्य कामगार विमा महामंडळाच्या राज्य प्रशासनाची भेट घेतली. पुणे, कोल्हापूरच्या धर्तीवर सातपूर येथील रुग्णालयाचे अधिकाधिक सक्षमीकरण करण्यासाठी सदर रूग्णालय इएसआयसी महामंडळाने स्वतःकडे हस्तांतरित करून घ्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी सिन्हा यांच्याकडे केली आहे.

खा. गोडसे यांनी मुंबईतील राज्य कामगार विमा महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त प्रणय सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी खा. गोडसे यांनी यापुढे आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची गरज असल्याची भूमिका मांडताना आधुनिक आरोग्य यंत्रणा उभारण्याबाबत सिन्हा यांचे लक्ष वेधले.

सातपूर येथील ईएसआयच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचार्‍यांची संख्या खूपच कमी असून या हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधांचा तसेच अत्याधुनिक आरोग्य यंत्रणेचा अभाव आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करूनही औद्योगिक क्षेत्रातील मजूर, कामगारांना आरोग्य सुविधांचा पुरेपूर लाभ मिळत नाही. यामुळे कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाचा विचार करून नाशिक शहरातील सातपूर येथील ईएसआय हॉस्पीटलची क्षमता आधिकाधिक सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्र अशा दोन संस्थांची पेक्षा रुग्णसेवा ईएसआयसी कार्पोरेशनने स्वत:कडे हस्तांस्तरण करून द्यावे, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी केली आहे. चर्चेप्रसंगी आर.के. अग्रवाल, अतिरक्ति कार्यकारी अधिकारी आशुतोष गिरी, विनायक बाकडे आदी अधिकारी उपस्थित होते.

खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या मंजुरासाठी सिन्नर तालुक्यात तीस खाटांचे रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य कामगार विमा विभागाच्या पथकाकडून गेल्या आठवड्यात प्रस्तावित रूग्णालयासाठी सिन्नर तालुक्यातील मोह आणि मुसळगाव येथे मोकळ्या भूखंडाची पाहणी करण्यात आली. रूग्णालय उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावित रूग्णालयामुळे तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या मजुरांचा आणि त्यांच्या कुंटूबियांच्या आरोग्याचा प्रश्न बन्याच अंशी सुटणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com