जनआशीर्वाद यात्रेसाठी नियोजन बैठक

जनआशीर्वाद यात्रेसाठी नियोजन बैठक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे ( Janaashirwad Yatra ) मालेगाव तालुक्यात येत्या मंगळवार दि. 17 ऑगस्टरोजी आगमन होत असून या यात्रेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांतर्फे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. यानिमित्त जाहिर सभा व शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रेस पालघर येथून प्रारंभ होत आहे. मालेगावात 17 ऑगस्ट रोजी या यात्रेचे आगमन होत असल्याने त्यासंदर्भात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क कार्यालयात पार पडून नियोजन समितीचे गठन करण्यात आले.

कार्यक्रम नियोजन प्रमुख म्हणून जिल्हा उपाध्यक्ष समाधान हिरे यांची तर सहप्रमुखपदी देवीदास कुँवर यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेचे स्वरूप कसे असणार याची माहिती दिली. डॉ. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्याला एक मोठी संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेचे तालुक्यात जल्लोषात स्वागत केले जाईल, अशी ग्वाही समाधान हिरे यांनी दिली.

मोदी सरकारने आदिवासी समाजाला न्याय दिल्याचे बरीच उदाहरणे आहेत. डॉ. पवार यांच्या रूपाने समाजाचा मोठा सन्मान झाला आहे. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचविली जाईल, अशी भूमिका देवीदास कुंवर यांनी मांडली. यात्रेचे आगमन व स्वागत सौंदाणे येथे होणार असून टेहरेमार्गे अमेय लॉन्स येथे सभा व त्यानंतर शहरात ठिकठिकाणी भेटी राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून विश्रामगृहावर बैठक घेतली जाणार आहे. यानंतर या यात्रेचे नामपूरकडे प्रस्थान होणार आहे.

बैठकीस पोपट लोंढे, मुकेश झुनझुनवाला, पं. स. सदस्य अरुण पाटील, संजय काळे, हरिप्रसाद गुप्ता, सुधीर जाधव, रविष मारू, हेमंत पूरकर, योगेश पाथरे, सलीम पिंजारी, राहुल पाटील, सुनील शेलार, प्रकाश मुळे, तुळशीदास ठाकरे, बापू सूर्यवंशी, कमलेश सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com