
वलखेड । वार्ताहर | Valakhed
‘कोणत्याही निवडणूक (election) लढवताना नियोजन महत्त्वाचे असते. योग्य नियोजन करून शिवसैनिकांना (shiv sainik) येणार्या निवडणुकीसंदर्भात तयारीला लागावे’, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर (Shiv Sena Deputy Leader Vinod Ghosalkar) यांनी केले.
दिंडोरी (dindori) येथे शिव संपर्क अभियानाबाबत (Shiv Sampark Abhiyan) मेळाव्यात उपनेते घोसाळकर बोलत होते. उपनेते घोसाळकर पुढे म्हणाले की, हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात कॉन्ट्रॅक्टर (Contractor) झाले पाहिजे. दुसर्या पक्षांकडे कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांच्या जीवावर ते निवडणुका जिंकतात. कॉन्ट्रॅक्टर तयार झाले पाहिजे व स्पर्धेत टिकले पाहिजे. शासनाच्या विविध योजना येतात. त्यांची माहिती घेऊन जनतेची कामे करावी असेही विनोद घोसाळकर यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख सुनील पाटील (District President Sunil Patil) यांनी सांगितले की, निवडणुका जिंकण्यासाठी मतदान (voting) महत्त्वाचे असते.
मतदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचावे व जनतेची कामे करावी असे सांगितले. यावेळी शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्यात (maharashtra state) महाविकासआघाडी (Mahavikasaghadi) आहे पण दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) कुठेही ती दिसून येत नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी मुंबईहून (mumbai) आलेले वक्ते गणेश परदेशी, स्नेहल मांडे, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, जालखेडचे उपसरपंच जीवन मोरे, लोकसभा संघटक विलास निरगुडे, गटनेते प्रदीप देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सहकार नेते सुरेश डोखळे, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, मंगला भास्कर, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, विठ्ठलराव अपसुंदे, उपजिल्हा समन्वयक संतोष वाघ, सुनील मातेरे, तालुका संघटक अरुण गायकवाड, संगम देशमुख, नगरसेवक सुनिता लहांगे, ज्योती देशमुख, सुजित मुरकुटे, कल्पना गांगुर्डे, युवा तालुकाप्रमुख निलेश शिंदे, महिला आघाडीच्या अस्मिता जोंधळे,
शीतल पवार, धनंजय भगत, नागेश गुजर, राजेश गुप्ता, विधानसभा संघटक वसंत घडवजे, तालुका समन्वयक उल्हास बोरस्ते, देवेंद्र धात्रक, अरुण कड, साहेबराव वडजे, विश्वास गोजरे, किशोर अपसुंदे, प्रभाकर जाधव, रावसाहेब जाधव, रघुनाथ आहेर, विजय पिंगळ, नारायण राजगुरु, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.