अत्यावस्थ रूग्णांच्या चाचणीस प्राधान्य; सुविधेसाठी दातार लॅबकडून नियोजन

अत्यावस्थ रूग्णांच्या चाचणीस प्राधान्य; सुविधेसाठी दातार लॅबकडून नियोजन
corona test

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

कोरोना चाचणी करण्यासाठी अत्यावस्थ, वृद्ध, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्राधान्य देण्यात येणार असून चांगल्या सुविधेसाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे.

यास सर्व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन कोवीड-१९ तपासण्या करणार्‍या दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड कंपनी अर्थात दातार लॅबने केले आहे.

Title Name
नाशिक विभागातील जिल्ह्यांना अशा मिळतील करोना लसी; पाहा एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ
corona test

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोविड १९ संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढत आहेत. कोरोना तात्काळ उपचारासाठी लवकरात लवकर कोरोना निदान होणे आवश्यक आहे.

यासाठी शासकीयसह इतर खासगी व दातार लॅबद्वारे तपासण्या करण्यात येत आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत लवकरात लवकर सर्वांना कोरोनाचे अवाहल देण्यासाठी दातार लॅबने खास नियोजन केले आहे.

यामध्ये आत्यावस्थ रूग्णांसाठी आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्या रूग्णास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येऊन तात्काळ ६ ते ८ तासात रिपोर्ट देण्यात येणार आहेत. सर्व स्वॅब संकलन केंद्रांवर ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, १२ वर्षाआतील लहान मुले, दिव्यांग व्यक्ती, गरोदर स्त्रीया यांचे स्वॅब घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

कलेक्शन सेंटरचा कालावधी सकाळी ८ ते रात्री ८ असा करण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन धारकांसाठी फास्ट ट्रॅक संम्पलची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे या नियोजनास सर्व नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन दातार लॅबच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com