नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशकातील पवन नगर भाजी मार्केट पाठोपाठ त्रिमूर्ती चौक भाजी मार्केट येथे देखील नागरिकांना प्रवेशासाठी पाच रुपये शुल्क आकारावे तसेच या ठिकाणी रस्त्यांचे नियोजन कशा पद्धतीने करावे याकरिता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पाहणी केली.

सध्या नाशिक शहरात करुणा रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे ा पार्श्वभूमीवर भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्याकरता पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवित गर्दी कमी करण्याकरिता भाजी बाजारात येणाऱ्या प्रतिव्यक्ती पाच रुपये दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली

या पाठोपाठच त्रिमूर्ती चौक भाजी मार्केट परिसरामध्ये चारही बाजू सील करून एकच इंट्री ठेवण्याबाबत पाहणी करण्यात आली. यावेळी परिमंडळ 2 उपायुक्त विजय खरात , सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते ,पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव आदींसह वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.