पूरपाणी नदीत सोडण्याचे नियोजन कराः भुजबळ

साचलेल्या पाण्याने बाधित शेती परिसराची पाहणी
पूरपाणी नदीत सोडण्याचे  नियोजन कराः भुजबळ

देवगाव । वार्ताहर | Devgaon

देवगाव-रुई शिवारातील पूर पाण्याचे (flood) निस्सारण करून शेतकर्‍यांच्या शेतात साचलेले पाणी गोदावरी पात्रात (Godavari vessel) सोडण्याची जलसंपदा विभाग (Department of Water Resources), महसूल आणि पोलीस यांनी समन्वयाने तत्काळ व्यवस्था करावी, असे आदेश माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister MLA Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे.

देवगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात साचलेल्या पाण्याची पाहणी यावेळी भुजबळ यांनी केली. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी निर्देश दिले. तालुक्यातील देवगाव, रुई, कानळद, खेडलेझुंगे या गावातील पुरपाणी शिवारातील नैसर्गिक नाल्याद्वारे गोदावरी नदीला (godavari river) मिळत होते. हा नैसर्गिक नाला एका ठिकाणी अडवला गेल्यामुळे 4/5 गावांच्या शिवारात शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साठलेले आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान (crop damage) झाले आहे.

या परिसरातील शेतकर्‍यांची ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आ.छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी देवगाव-रुई भागात प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतात आणि नाल्यावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar Sharad Ghorpade), नाशिक पाटबंधारे विभागाचे (Nashik Irrigation Division) कार्यकारी अभियंता सागर शिंदे (Executive Engineer Sagar Shinde) आणि पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी शाखेचे अभियंता तसेच राष्ट्रवादीचे हरिश्चंद्र भवर, मा.पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, कानळदचे मा.सरपंच शिवाजी सुपनर, देवगावचे मा. सरपंच विनोद जोशी, कानळद सरपंच शांताराम जाधव, खेडलेझुंगे सरपंच विजय सदाफळ आदी उपस्थित होते.

कालव्यातून लिकेज होत असलेले पाणी जाणारा नाला हा अत्यंत उथळ झालेला आहे. या नाल्यातून आजूबाजूच्या तीन गावांना पाणी जाते. या नाल्यांमध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे (encroachment) या नाल्याचे खोलीकरण करण्याची मागणी शेतकरी (farmers) करत होते. या नाल्याच्या आजूबाजूला असणार्‍या शेतजमिनीचे प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

त्यामुळे छगन भुजबळ यांनी या परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन या भागाची पाहणी केली आणि प्रथम अडवलेला नाला मोकळा करणे, नाल्यांचा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभाग (Department of Water Resources) आणि महसूल विभाग (Department of Revenue), पोलीस अधिकार्‍यांना दिल्या.

गोदावरी डावा कालव्याचे काही भागात काँक्रिटीकरण (concretization) करण्याचा प्रस्ताव शासनास पाठवणेबाबत सूचना दिल्या. संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करावी असे आदेश दिले. याप्रसंगी राजेंद्र बोचरे, जयेश लोहारकर, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, संपत आढांगळे, पोलीस पाटील सुनील बोचरे, सचिन बोचरे, गोरख निलख, दिलीप शिरसाठ, भगवंत बोचरे आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी परिसरातील उपस्थित शेेतकर्‍यांनी आपल्या समस्यांचा पाढा भुजबळांपुढे वाचला. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन भुजबळांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com