कुपोषण निर्मूलनासाठी योजना

कुपोषण निर्मूलनासाठी योजना

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) आयआयटी मुंबईच्या (IIT Mumbai) मदतीने कुपोषणमुक्तीसाठी (Malnutrition) प्रयत्न केले. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही (nashik) कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यासाठी जिल्हा परिषद (zilha parishad) नाशिक आणि आयआयटी मुंबईच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनासाठी (Elimination of malnutrition) कृती योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग (Department of Women and Child Welfare) व आयआयटी मुंबई (IIT Mumbai) यांच्या वतीने शुक्रवारी (दि.14) तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आयआयटी मुंबई येथील प्रा.डॉ रूपल दलाल, प्रा.डॉ.कानन, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे (Deepak Chate, District Program Officer of Women and Child Welfare Department), जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.हर्षल नेहते उपस्थित होते.

यावेळी मित्तल कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगताना म्हणाल्या, जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी (Elimination of malnutrition) आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेण्यात येणार आहे. पुढील काळात आशा सेविकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर घेऊन कुपोषण निर्मूलनाचा कृती आराखडा तयार येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयआयटी मुंबई येथील प्रा.डॉ. रूपल दलाल यांनी सुयोग्य स्तनपानाबद्दल मार्गदर्शन केले.

बाळाची आई गरोदर असल्यापासून पुढील एक हजार दिवस महत्त्वाचे असतात. गरोदर मातांना या काळात स्वतःच्या व बाळाच्या आहाराचे योग्य मार्गदर्शन केल्यास कुपोषणाच्या समस्येवर आपण निश्चित मात करू शकतो. यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या वतीने गुजरात येथील भाग, मेळघाट येथील बालकांच्या कुपोषण निर्मूलनाच्या यशस्वी प्रयोगांबद्दल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय सोनवणे, रवींद्र देसाई, विस्तार अधिकारी सांख्यिकी योगेश भोये, संजय मोरे, परिचर विश्वजित खैरे, सारिका गायकवाड आदींनी मेहनत घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com