आरक्षण संपविण्याचा घाट : भुजबळ

आरक्षण संपविण्याचा घाट : भुजबळ

सटाणा । प्रतिनिधी | Satana

देशातील काही लोक आरक्षण (Reservations) संपविण्याच्या प्रयत्नात असून शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केली.

तालुक्यातील वटार येथे सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था (Savitribai Phule Educational Institution) संचलित सावित्रीबाई फुले शाळेच्या नूतन इमारतीचे (New buildings) उदघाटन व संवाद मेळाव्यात ना. भुजबळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनपाचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे,

माजी आ. संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, डॉ. सतिष लुंकड, इंजि. जिभाऊ गांगुर्डे, मच्छिंद्रनाथ शेवाळे, सचिन सावंत, दगडू महाजन, दौलत गांगुर्डे, विलास शिंदे, जितेंद्र बच्छाव, लक्ष्मी मोरे, मुरलीधर खैरनार, पोपट खैरनार, विठ्ठल खैरनार, माजी सरपंच रामदास खैरनार, प्रशांत बागुल, हरिभाऊ खैरनार, ज्ञानदेव खैरनार, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ना. भुजबळ यांनी यापूर्वी अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जालना (jalna) येथे आयोजित पहिल्या मेळाव्यात शरद पवार (shrad pawar) यांनी उपस्थितांच्या मागणीनुसार तात्काळ मंडल आयोगाची अंमलबजावणी केली होती, अशी आठवण करून देत 27 वर्षांपूर्वी मिळालेले आरक्षण (Reservations) संपविण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे.

आरक्षणामुळे अनेक विद्यार्थी घडले, उच्चपदावर गेले. शिक्षणात (education) जसे पुढे गेले पाहिजे तसेच राजकीय क्षेत्रात देखील ओबीसी (OBC) पुढे गेले पाहिजेत. त्यासाठी आरक्षण दिले मात्र आज आरक्षणावर गदा आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष मोरे, डॉ. लुंकड यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास संस्थापक संचालक रामकृष्ण खैरनार, हरिभाऊ खैरनार, रामदास बागुल, बारकू खैरनार, मधुकर गांगुर्डे, बाळू बागुल, बाळासाहेब दशपुते, सुरेश पवार,सुनील खैरनार विद्यार्थी व महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव गांगुर्डे यांनी केले तर किशोरी खैरनार यांनी आभार मानले.

ढोलताशांच्या गजरात स्वागत

जैन तिर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे येत्या 15 जूनपासून ऋषभदेवांचा पहिला महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त प्रशासन व मूर्तीनिर्माण समितीच्या आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भुजबळ यांचा दौरा असतांना सटाणा शहर विकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी बसस्थानक चौकात ना. भुजळांचे जंगी स्वागत केले. बसस्थानक चौकात भव्य स्टेज उभारुन 200 किलो वजनाचा पुष्पहार व पुष्पवृष्टीने ना. भुजबळांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताश्यांच्या गजरात आकाशात फुगे सोडण्यात आले.

Related Stories

No stories found.