जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्यांचे नियोजन करा

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भुजबळांचे आदेश
जिल्ह्यातील ऑक्सिजन साठ्यांचे नियोजन करा

नाशिक | Nashik

संभाव्य तिसर्‍या लाटेची (Corona Third Wave) शक्यता, तसेच डेल्टा प्लस (Delta Plus), लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे (Corona New Veriant) संक्रमण लक्षात घेता करोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसह उद्योगधंदे (District Industry) सुरू राहण्यासाठी ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी दिलेे.

नाशिक जिल्हा व शहरातील कोरोना सद्यस्थिती (Nashik District Corona Crisis) आणि करोना पश्चात आजारांबाबत आयोजीत आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात सुरू करण्यात आलेले उद्योग, कंपन्या संभाव्य तिसर्‍या लाटेत सुरू राहण्यासाठी त्यांना लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे (Corona Rules Regulations) काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्याकरीता उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण (Workers Corona Vaccination) करून घ्यावे. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेथील जवळच्या परिसरात करण्यात यावी अथवा त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी.

या सर्व गोष्टींचे नियोजन उद्योजकांनी केले आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर माहिती औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अधिकार्‍यांनी पुढील बैठकीत सादर करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध (Oxygen Availability) होण्यासाठी मंजुर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प (Oxygen production project)

तातडीने सुरू करण्याचे प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे.

हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता (Completion of technical matters) करून घेवून त्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या (Rural Corona Crisis) काही प्रमाणात वाढलेली आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने नियोजन करण्यात यावे.

याकरीता ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांना परवानगी देते वेळी लग्न समारंभासाठी निर्धारीत केलेल्या उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच लग्नासाठी येणार्‍या प्रत्येकाचे तापमान तपासणीसह त्यांना मास्कचा व सॅनिटायझरचा (Use Mask And Sanitizer) वापर करणे अनिवार्य करण्यात यावे. लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत(MJPJY) सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यातून कोणीही गरजु वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com