शिवसेना दीनदुबळ्यांचा आधार हे जनतेच्या मनात बिंबवा: चौधरी

शिवसेना दीनदुबळ्यांचा आधार हे जनतेच्या मनात बिंबवा: चौधरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिवसेना पक्ष (Shiv Sena party) दीनदुबळ्यांचा आधार आणि आमजनतेचा श्वास आहे हे सर्वांच्या मनात बिंबवा आणि लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करा,असे प्रतिपादन जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (District Liaison Officer Bhausaheb Chaudhary) यांनी केले.

शिवसंपर्क अंतर्गत शिवसेना (shiv sena) मनामनात शिवबंधन (shiv bandhan) घराघरात या अभियानाचा शुभारंभ नववर्षदिनी महानगरातील सर्व विभागांत भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर (District Chief Vijay Karanjkar), महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि मान्यवरांच्या हस्ते झाला.23 जानेवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

नाशिकरोड (nashik road) विभागात छपरु कम्युनिटी हाल मोटवानी रोड (पुरुषोतम स्कूल मागे), पंचवटी (panchavati) विभागात निर्मला मंगल कार्यालय (सीतागुंफाजवळ), मध्य नाशिक (Central Nashik) विभागात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (शालिमार चौक), सिडको (CIDCO) क्रॉम्प्टन हॉल (सावता नगर) आणि सातपूर विभागात साईरुद्र चौक जाधव संकुल (अशोकनगर) येथे या उपक्रमांचा शुभारंभ झाला.

आपल्याला मतदाराच्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांच्यात पक्षाबद्दल आत्मीयता आणि आपुलकी निर्माण करायची आहे,असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले. शिवसेना हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे हे आपण विविध उपक्रमांनी सिद्ध केले आहे.मात्र पक्षाचा अधिक विस्तार करून सामान्यांच्या हृदयात राज्य करायचे असेल तर त्यांच्याशी अधिक जवळीक साधून त्यांच्या छोट्या- छोट्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे शिवधनुष्य आपणास उचलावे लागेल आणि त्यासाठीच शिवसेना (shiv sena) मनामनात शिवबंधन घराघरात या अभियानाला विशेष महत्व आहे.

महापालिका निवडणूक (Municipal elections) जिंकायची असेल तर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहिले पाहिजे, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी संबोधित करतांना सांगितले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड (datta gaikwad), मनपा विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते (ajay boraste), माजी माहापौर विनायक पांडे (vinayak Pande), युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, मनपा प्रभाग सभापती सौ सुवर्णा मटाले, प्रशांत दिवे, राजू आण्णा लवटे, माजी महापौर यतीन वाघ, महिला पदाधिकारी मंगला भरकर,

मंदा दातीर, शोभा मगर,शोभा गटकळ,लक्ष्मी ताठे, ज्योती देवरे,शिवसेना पदाधिकारी नितीन चिडे, दिगंबर मोगरे, सुभाष गायधनी, माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी, गुलाब भोये , आदी पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवराच्या हस्ते शिवसेना नगरसेवक,विभाग प्रमुख सुयश पाटील, शिवसैनिक राहूल सोनवणे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com