संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर नाशिक रोड ते नारायणगाव परिसरात सतत पडत असणार्या पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यांकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसुली करणार्या कंपनीच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहन चालकतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणार्या वाहन धारकांकडून टोल वसुल केला जातो. अनलाँकनंतर मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरू झाली. गेली वर्ष भर महामार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे सध्या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे. पावसाळ्यात पाणी साचून रस्ता खराब झाला असून महामार्ग प्रवासासाठी डोकेदुखी बनली आहे.

नाशिक रोड, सिन्नर घाट, नांदूर शिंगोटे, कर्हे घाट, चंदनापुरी घाट, घारगाव, बोटा, आळेफाटा, मंचर नारायणगाव या परिसरात खड्डे पडले असून सर्वत्र खड्याचे साम्राज्य आहे.

या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले जात आहे.त्यामुळे वाहन चालकांना महामार्गावरील खड्डे चुकविता तारेवरची कसरत करावी लागत आहे. महामार्गावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादामध्ये वाहनचालकांचा वाह नांवरील ताबा सुटून अपघातास निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देऊन हिवरगाव पावसा येथीलटोलवसुली करणार्या कंपनीला तात्काळ या महामार्गावरील खड्डे बुजविण्या बाबतचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी आता यामहा मार्गावरून प्रवास करणार्या वाहन चालकांमधून आणि महामार्गाच्या आसपास राहणार्या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे केली आहे. जो पर्यंत खड्डे बुजवीले जात नाही तोपर्यंत टोलवसुलीत सवलत द्यावी अशी आग्रही मागणी वाहन चालकांनी व्यक्त केले आहे.