सोग्रस-भाटगाव रस्त्याची दुरवस्था

सोग्रस-भाटगाव रस्त्याची दुरवस्था

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चांदवड तालुक्यातील सोग्रस-लासलगाव रोडची सोग्रस ते भाटगावपर्यंत ( Sogras- Bhatgaon Road ) गेल्या वर्षभरापासून चाळण झाली असून, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था झाली आहे तरी संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन किमान खड्डे तरी बुजवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू असून या मार्गावरून कांदा वाहतूक करणारे ट्रॅक्टर तसेच टोमॅटोची वाहतूक करणार्‍या वाहनांना मोठ मोठ्या खड्ड्यांंचा सामना करावा लागत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात असून, खराब रस्त्यामुळे होणार्‍या वाहनांच्या नुकसान दुरूस्तीच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी वर्गासह ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.

शिवाय चांदवड टोल वाचवण्यासाठी या मार्गावरून इतर वाहनांची देखील वर्दळ वाढली असल्याने रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून शिरसाणे, चिंचोले, भाटगाव, नारायणगाव, परसूल, भोयेगाव, जोपूळ आदी परिसरातील शेतकर्‍यांना हा रोजचा त्रास असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचण्यास अधिक वेळ लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com