कळवण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कळवण तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

पाळे खुर्द । संदिप पाटील Kalwan / Pale Khurd

कळवण तालुक्यातील ( Kalwan Taluka ) सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. असा एकही रस्ता नाही, त्यावर खड्डे ( Pits on Roads )नाहीत. तालुक्यात मुख्य रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींची फक्त कागदावर विकास आहे अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कनाशी - सापुतारा रस्ता ( Kanashi- Saputara Road )खिळखिळा झाला आहे. त्याच रस्त्यावरून शेतकर्‍यांचा भाजीपाला गुजरात राज्यामध्ये विक्रीस जातो, मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहचत नसल्याने भाव योग्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहेत त्याच बरोबर पाळे ते हिंगवे रस्त्याची पूर्णत दुरवस्था झाली असून मोठे मोठे खड्डे पडले आहे.

एक - एक फुटाचे खड्डे पडल्याने असल्यामुळे अपघात संख्या वाढली आहे. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहनचालकांनाच दुखापत होत आहे. जिल्हा परिषद विभाग व सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिकारी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. कळवण तालुक्यातील बोरगाव ते अभोणा या मुख्य रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. दोन - दोन फुटाचे खड्डे पडले आहे. वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अभोणा ते बोरगाव कनाशी ते हातगड मुख्य रास्ता गुजरात राज्याला जोडला जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने भाजीपाला घेऊन जाणार्‍या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांचा भाजीपाला वेळेवर पोहचत नसल्याने व भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याचे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून तात्काळ रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी वेळोवेळी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अभोणा ते बोरगाव कनाशी ते हातगड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या प्रमुख रस्त्यावर अंदाजे 60 ते 70 गावाची रहदारी असल्यामुळे रोजचे हजारो नागरिक रस्त्यावरून ये - जा करीत असल्यामुळे काही नागरिकांना मणक्याचा आजार लागला आहे. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी या रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातात. परंतु एक ते दोन महिन्यात त्याची परिस्थिती जैसे थे होते. पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पायी चालणे देखील कठीण झाले आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांचे काम हे पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परंतु अनेक वर्षे झाली तरी या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. याचा मात्र नागरिकांना व वाहधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या आजूबाजूच्या साईट गटारी काढल्या नसल्यामुळे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून त्वरीत या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जनतेनी केली आहे.

खड्ड्यांची डोकेदुखी गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. खड्डे मोठे असल्यामुळे चालणेदेखील कठीण असते. खड्डयांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने .वाहनचालक थेट खड्ड्यात जाऊन अपघात होतात. लोकप्रतिनिधींचा विकास फक्त कागदावरच आहे तसेच तालुक्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रदीप पगार, तालुकाध्यक्ष - क्रांतिवीर छावा संघटना

कळवण तालुक्यातील अनेक रस्त्याने रात्री चालणे किंवा वाहन चालविणे सर्वात कठीण आहे. खड्डा केव्हा मध्ये येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे वाहनचालक चाचपडत आपली वाहने चालवितात. यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. काही नागरिकांना मणक्याचा आजार लागला आहे,रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहे. त्वरीत संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सतीश पाटील, नागरिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com