मनपा मुख्यालया समोरील चौक खड्ड्यांच्या विळख्यात

मनपा मुख्यालया समोरील चौक खड्ड्यांच्या विळख्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे शरीरातील जवळपास सर्व मुख्य चौक तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे ( Pits on Roads ) पडले आहे. काल दिवसभर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, तरी महापालिका प्रशासन आता त्वरित खड्डे बुजवण्याबरोबर डांबरीकरण देखील सुरुवात करावी, त्यामुळे नाशिककरांना त्रास कमी होणार. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयाच्या बाहेरच्या चौकातच मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव सणाच्या पूर्वी शहर परिसरातील रस्त्यांवरील सुमारे 15 हजार खड्डे बुजवण्यात आले होते, मात्र पुन्हा जोरदार पद्धतीने सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे महापालिकेची कामे पाण्यात वाहून गेले असून आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवण्याची मोहिम महापालिकेने हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान पावसामुळे शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचा खच पडला आहे. सध्या महापालिकेत प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे ठेकेदारांकडून सतत खड्डे बुजवण्याची कारवाई करून घेण्यात येत आहे. शहरातील सुमारे 45 मार्ग असे आहे की ज्या ठिकाणी ठेकेदारांनी रस्ते बनवले आहे, मात्र रस्ते तयार केल्यानंतर तीन वर्ष त्याच्या देखरेखीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असते त्यामुळे हे 45 मार्ग त्याच लायबिलिटी पिरेड मध्ये असल्यामुळे ठेकेदारांच्या माध्यमातून महापालिका खड्डे बुजून घेत आहे तर ज्या ठिकाणी लाबिलिटी पिरेड संपलेले आहे अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याची कारवाई सुरू आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सतत या कामाकडे लक्ष देऊन आहे. तर दुसरीकडे शहर अभियंता शिवकुमार वंजारी हे देखील पाहणी करून खड्डे व्यवस्थित बुजविण्यात येतात आहे की नाही याकडे लक्ष देऊन आहे. शहरातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौक, शालिमार सिग्नल, गंगापूर रोड, पेठ रोड, सारडा सर्कल आदी भागातील रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये खड्डे तयार झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com