नाशकात पुन्हा उफाळला चुंबळे विरुद्ध पिंगळे संघर्ष; हे आहे कारण

नाशकात पुन्हा उफाळला चुंबळे विरुद्ध पिंगळे संघर्ष; हे आहे कारण

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory) पुन्हा सुरू करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने (Nashik Agricultural Market Committee) कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास घेण्याचा प्रस्ताव सरकारला दिला...

साखर कारखाना चालविण्याचा अधिकार बाजार समितीला नाही, अशी भूमिका घेऊन बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे (Shivaji Chumble) यांनी या प्रस्तावाला विरोध करून मुख्यमंत्र्यासह सहकार आयुक्त, पणन विभागाकडे तक्रारीचे पत्र दिले आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना सात-आठ वर्षांपासून बंद असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागले आहेत.

पंचक्रोशीतील अर्थकारणाचा स्रोत असलेला हा साखर कारखाना (Sugar factory) पुन्हा सुरू करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्यासंदर्भात सभासदांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर प्रस्ताव संमत केला.

बाजार समितीच्या राजकारणात विद्यमान सभापतींचे पारंपारिक कट्टर विरोधक असलेले माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी नासाकाच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीला लुडबुड करू देऊ नये किंबहूना बाजार समितीला तो घटनात्मक अधिकार नाही असा आक्षेप नोंदवणारे पत्र मुख्यमंत्री, पणन तसेच सहकार मंत्री आणि संबंधित विभागाचे आयुक्त, निबंधक उपनिबंधकांना पाठवले आहे.

विद्यमान सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) आणि कारखाना इमारत उभी असलेल्या मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांच्या संयुक्त पुढाकाराने या कारखान्याची चाके पुन्हा फिरतील अशी आशा पल्लवीत झाली असताना शिवाजी चुंबळे यांच्या या पत्राने खोडा घातला आहे.

चुंभळे यांनी पत्रात मांडलेले महत्वाचे मुद्दे

बाजार समितीला एखादी डबघाईस आलेली संस्था अथवा खाखर कारखाना चालविण्यास घेण्याचा घटनात्मक अधिकार नाही. गैरव्यवहार व भ्रष्टाचार आदी कारणांमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. कार्यकाळ संपलेला असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यामुळे ९ जुलै रोजी नासाका सुरू होण्यासाठी घेतलेली सभा व केलेले ठराव बेकायदेशीर आहेत. पिंगळेंना कारखाना चालवायचा असेल तर त्यांच्या आनंद ग्रेप्स या संस्थेने चालवावा.

कारखाना सुरू करून सभासद आणि कामगारांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्नांतून बाजार समितीने पहिले पाऊल टाकले आहे. मात्र, सहकाराचा अनुभव नाही, अभ्यास नाही, असल्या मंडळींना सभासद आणि कामगारांचे हित पायदळी तुडविण्यातच अधिक स्वारस्य आहे. ज्यांनी नासाकाला विरोध केला त्यांचे पुर्वचारित्र तपासण्याची गरज आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पद तीन वर्ष असताना बाजार समितीचा खेळखंडोबा केला. लाचलूचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. सहकार क्षेत्राचा अनुभव नाही. त्यांनी नियम घटना शिकविण्याच्या फंदात पडू नये.

- देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com