पिंपळगावची सुवर्णपदकाची परंपरा कायम

पिंपळगावची सुवर्णपदकाची परंपरा कायम

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Basavant

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ (All India Inter-University) नौकानयन (कॅनोईंग व कयाकिंग) स्पर्धेत पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basavant) येथील स्पर्धेत 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक (Silver medal) पटकावून आपली सुवर्ण पदकांची परंपरा (Tradition of gold medals) कायम ठेवताना पुणे विद्यापीठाला (University of Pune) कॅनोईंग (Canoeing) प्रकारात उपविजेतेपद मिळवून दिले.

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (K.K. Wagh College) एकूण आठ खेळाडूंनी चंदिगडच्या (Chandigarh) जगप्रसिद्ध ‘सुकना लेक’ या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नौकानयन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) प्रतिनिधित्व नौकानयन (कॅनोईंग व कयाकिंग) स्पर्धेत केले. यात कॅनोईंग फोर प्रकारात 200 मीटर अंतराच्या शर्यतीत पहिले सुवर्णपदक पटकाविताना महाविद्यालयाचे खेळाडू धनेश भडांगे, हेमंत हिरे, अरबाज शेख, विशाल गोडे या चमूने अंतिम फेरीत 36.54 सेकंद वेळ नोंदविताना अनुक्रमे पंजाब, चंदिगड व केरळ (keral) विद्यापीठांचा पराभव केला.

दुसरे सुवर्णपदक कॅनोईंग टू प्रकारात 500 मीटर अंतराच्या शर्यतीत हेमंत हिरे व साद पटेल यांच्या जोडीने अंतिम फेरीत केरळ विद्यापीठ व लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पराभव करते वेळी 1 मिनिट 58 सेकंद व 10 मायक्रोसेकंद अशी वेळ नोंदवली. तर तिसरे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्‍या 200 मीटर अंतराच्या कॅनोईंग वन प्रकारच्या अंतिम फेरीत उगवता राष्ट्रीय खेळाडू हेमंत हिरे याला पंजाब (punjab) विद्यापीठ पतियाळाच्या सिद्धांतसिंगकडून केवळ एका सेकंदाच्या फरकाने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.हेमंत पाटील, प्रा.सागर कर्डक, जितेंद्र कर्डिले, योगेश गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ.सुनील ढिकले, निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख, जिल्हा क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास मोरे, उल्हास मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा.एस.एन. अहिरे, क्रीडा संचालक प्रा.हेमंत पाटील, प्रा.नारायण शिंदे, प्रा.नामदेव गावित आदींसह शहर व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

जिद्द आणि चिकाटीमुळे यश ग्रामीण भागातील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे खेळाडू विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सातत्यने महाविद्यालयाच्या लौकिकात भर पाडत असतात. अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उत्तम खेळाची परंपरा वृद्धिंगत करीत आहे. याचा अभिमान वाटतो.

- प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com