पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत: आ.बनकर

पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत: आ.बनकर

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

जोपूळ रोडवरील भीमाशंकर स्कुल समोरील तीन-चार एकर जागेवर दीड-दोन वर्षापूर्वी उभारण्यात आलेले ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय (Rural Sub-District Hospital) लवकरच सर्वसामान्य रुग्ण सेवेत दाखल होणार असल्याच्या हालचालिंनी वेग धरला आहे.

करोनाच्या (corona) महामारीमुळे रुग्णालयासाठीची नोकरभरती (Recruitment) करणे शासनाला शक्य न झाल्याने येत्या काही दिवसात नोकर भरती प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच पिंपळगाव बसवंत (pimpalgaon basvant) येथील ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय रूग्ण सेवेत दाखल होणार असल्याचे आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी म्हटले आहे. कोविड (covid-19) विषाणूचा प्रादूर्भाव ओसरल्यावर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन लोकार्पण केव्हा होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काही दिवसाच्या अंतराने आजी-माजी आमदारांनी उद्घाटन केले होते.

परिणामी रुग्णालयाच्या श्रेयवादावरुन तालुक्यात चर्चा झाली होती. परंतु त्यावेळी करोना संसर्ग वाढल्याने या प्रकरणावर विरजन पडले होते. परंतु आता पुन्हा रुग्णालय सुरू झाल्याने याबाबत आमचे प्रतिनिधीने आमदार दिलीप बनकर यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच या रुग्णालयासाठी शासन स्तरावरून नोकरभरती केली जाईल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून या प्रक्रियेला वेग आला आहे. नोकर भरतीपूर्वी संबंधित अधिकारी व सेवकांच्या वेतन कोड ला मंजुरी मिळाली असून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात एकूण 60 बेडची व्यवस्था राहणार आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह 30 कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.

रुग्णालयाची नोकरभरती संदर्भातील प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरू होऊन पूर्ण केली जाईल. एकदा वैद्यकीय अधिकारी व मंजूर सेवकवर्ग भरती प्रक्रिया या महिना अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेशी चर्चा करून या रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात येईल. पिंपळगाव शहराची लोकसंख्या 60 हजाराच्या वर झाली आहे. या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला दिंडोरी (dindori), निफाड (niphad) आणि चांदवड (chandwad) तालुक्यातील 24 गावे जोडण्यात आली आहे.

या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचा फायदा 24 गावातील नागरिकांना होणार आहे. दि.24 ऑक्टोबर 2018 रोजी शिवसेना (shiv sena) नेते उद्धव ठाकरे व तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Revenue Minister Chandrakant Patil) यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन (bhumipujan) करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधकाम पूर्ण करण्यात आली. पण त्या दरम्यान करोनाचा संसर्ग वाढल्याने तालुक्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी या रुग्णालयात एप्रिल 2019 मध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले.

परंतु मध्यंतरीच्या काळात कोविड सेंटर बंद झाल्याने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सुरू व्हावे असा आवाज दै. देशदूतने उठवला होता. सदर रुग्णालयासाठी कर्मचारी मंजूर होऊनही भरती करण्यास विलंब लागला. परंतु आता हे जिल्हा रुग्णालय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. 15 ते 20 एप्रिलपर्यंत कर्मचार्‍यांची भरती पूर्ण होईल आणि त्यानंतर येथील ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय रुग्णसेवेसाठी खुले होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com