पिंपळगावला कर भरणा केंद्र बनले डिजिटल

पिंपळगावला कर भरणा केंद्र बनले डिजिटल

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

डिजिटल इंडिया (Digital India) या शासनाच्या संकल्पनेत पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

नागरिकांनी विविध प्रकारच्या सेवा आता डिजिटल (Digital) पद्धतीने देण्यात सुरवात केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सर्व प्रकारचे दाखले ऑनलाईन (online) पद्धतीने दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने आता ग्रामपंचायतचे कर ‘फोन पे’ (PhonePay) या डिजिटल पद्धतीने स्विकारले जात आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने ‘फोन पे’ पद्धतीने कर (tax) भरणा सेवेची सुरुवात ग्रा.पं. सदस्य गणेश बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, प्रदीप चौधरी, विलास नीलकंठ, रुपाली धुमाळ, ग्रा.पं. कर्मचारी तसेच कोटक महिंद्रा बँकेचे निमेश गुजराथी, सागर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या सुविधेमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये येवून कर भरण्यास लागणारा वेळ वाचणार आहे.

ग्रामपंचायतीने सदरची फोन पे द्वारे कर भरणा करण्याची सेवा सुरु करतांना सदरचे क्यु आर कोड गावामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. किमान 20 ठिकाणी क्यु आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापुढे नागरिकांनी फोन पे द्वारे कराची रक्कम भरून त्याचा स्क्रीन शॉट (Screen shot) दिलेल्या मोबाईलवर (mobile) दिल्यास त्याच दिवशी त्यांना कराची पावती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ तर वाचणारच आहे.

नागरीकांनी या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन सदस्य गणेश बनकर यांनी केले आहे. या सुविधेमुळे नागरिकांच्या वेळेत बचत होऊन ग्रामपंचायतचे उत्पन्नातही वाढ होणार आहे. सध्या सप्टेंबर अखेर पर्यंत कर भरल्यास 5 टक्के करात सूट मिळणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना राबवते. आता नव्याने डिजिटल इंडिया संकल्पनेत फोन पे द्वारे कर भरणा नविन डिजिटल सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने कर भरणे सुलभ व सोपे होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com