पिंपळगावला चोर्‍यांमध्ये वाढ; नागरिकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

पिंपळगावला चोर्‍यांमध्ये वाढ; नागरिकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

येथे महिन्याभरापासून चिंचखेड रस्त्यावरील (Chinchkhed Road) उपनगरांमध्ये चोरट्यांनी (Thieves) धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी (police) चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात या मागणीसाठी चिंचखेड रस्त्याचे नागरिक आक्रमक झाले आहेत. चोरट्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी झालेल्या बैठकीत नागरिकांनी दिला आहे.

चिंचखेड रोड परिसरातील ग्रा.पं. सदस्य अल्पेश पारख तसेच दीपक विधाते यांच्या पुढाकाराने झालेल्या नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विशेष बैठकीसाठी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पावसे (Assistant Police Inspector of Pimpalgaon Basvant Police Station) उपस्थित होते. पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) नोकरदारांची नागरी वसाहत अशी चिंचखेड रस्त्याची ओळख आहे. या परिसरात चोरट्यांनी महिन्याभरापासून सारखा धुडगूस घालत दहा घरफोड्या केल्या आहेत. भरवस्तीत चोरटे लूट करीत पोबारा करीत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे.

चिंचखेड रस्त्याची शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गस्त (Police patroling) वाढवावी. तसेच परिसराला स्वतंत्र पोलीस चौकी द्यावी अशी मागणी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पावसे म्हणाले की, पोलिसांची चोरट्यावर करडी नजर आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना रोकड व मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. शेजार्‍यांना बाहेरगावी जात असल्याबद्दल सूचित करावे. नागरिकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्व.अशोकराव बनकर उद्यानात झालेल्या बैठकीस महेंद्र ठाकरे, विजय पोटे,

नितीन उगले, रतन आवारे, दीपक आहेर, आकाश शिरसाट, उदयन भोसले, दीपक दारुंठे, रत्नाकर दवंगे, संदीप सोनवणे, अनिल भोगे, जयराम मोरे, पुंडलिक मोरे, प्रदीप सोनजे, ठोंबरे, आप्पा गायकवाड, अशोक निकम, रत्नाकर रोटे, संदीप थोरात, अविनाश लचके, संतोष जाधव, केदू बोबडे, राकेश बाविस्कर, अमोल कोल्हे, रुपाली काळे, लभडे ताई, पल्लवी आव्हाड, सोनाली सूर्यवंशी आदींसह पिंपळगाव बसवंतच्या विविध उपनगरांमधील रहिवाशी, व्यवसायिक, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com