माथाडी कामगारांचा संप मिटला; उद्यापासून  पिंपळगावात लिलाव होणार पूर्ववत

माथाडी कामगारांचा संप मिटला; उद्यापासून पिंपळगावात लिलाव होणार पूर्ववत

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर Pimpalgaon Baswant

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी उलाढाल होत असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Baswant APMC) गेल्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी संप पुकारल्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. (APMC will start from tomorrow morning) हा संप मिटला असून उद्या (दि १२) सकाळी नऊ वाजेपासून लिलाव पूर्ववत होतील अशी माहिती पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली....

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत पंचक्रोशीसह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतमाल विक्रीसाठी दाखल होत असतो. (Onion auction will start from tomorrow) अचानक माथाडी कामगार टोळी दोनच्या (mathadi kamgar toli 2) कामगारांनी मंगळवार पासून काम बंदचा पवित्रा घेतल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाले होते. यामुळे कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली होती.

३५० माथाडी कामगारांनी व्यापारी वर्गास कुठलीही पूर्व कल्पना न देता मंगळवार दुपारपासून वाढीव मजुरीसह (Increased wages) वाढीव वाराही मिळावी या प्रमुख मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारल्याने पिंपळगाव बाजार समितीतील लिलाव ठप्प झाले होते. दरम्यान, दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्यापासून लिलाव सुरु होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com