पिंपळगाव बसवंत: अतिक्रमण हटवून रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत: अतिक्रमण हटवून रस्त्याचे रूंदीकरण  करण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत । वार्ताहर | Pimpalgaon Baswant

येथील मविप्रच्या (MVP) होरायझनमध्ये पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना (students) जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पिंपळगावच्या रानमळा परिसरात सुसज्ज वास्तू उभारली आहे. मात्र शाळेपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता अरूंद असल्याने विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक (teachers) व संस्थेच्या पदाधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण (Encroachment) हटवून हा रस्ता रुंद करण्याची मागणी होत आहे.

पावसाळा (monsoon) सुरू असल्याने हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. गुरुवार दि.7 रोजी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन रस्त्याच्या खाली उतरली पण सुदैवाने अपघात (accident) टळला. मोजणी होऊन रस्त्याचे अतिक्रमण हटवून रस्त्याचे रूंदीकरण (Road widening) करण्याची मागणी होत आहे. पिंपळगावला निफाड (niphad) रस्त्यावरील रानमळा परिसरात मविप्र शिक्षण संस्थेने होरायझन इंग्लिश मीडियम स्कूलची (Horizon English Medium School) भव्य वास्तू उभारली.

दर्जेदार शिक्षण (education) व्यवस्थेबरोबरच पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सुमारे 500 विद्यार्थी सध्या या नव्या वास्तूत वाघिणीचे दूध पीत आहेत. मात्र निफाड रस्त्यापासून ते पाळेकर वस्तीमार्गे होरायझनच्या इमारतीपर्यंत पोहोचण्याचे अंतर अर्धा किलोमीटर आहे. 500 मीटरचा हा प्रवास पार करतांना विद्यार्थ्यांसह (students) सर्वांचीच अग्निपरीक्षा ठरत आहे. या रस्त्याची रूंदी अवघी सहा मीटर आहे. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली तर अडकून पडतात.

शाळेकडे येणार्‍या वाहनाबरोबरच या परिसरात शेतकर्‍यांची वस्ती आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक वाहने असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा मार्ग अधिकच जीवघेणा ठरत आहे. गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन रस्त्याच्या कडेला उतरली. या व्हॅनचा अपघात होता होता वाचला. ही दुर्घटना पाहता या मार्गाचे रूंदीकरण करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना ओढवून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे.

यासाठी या रस्त्याची शासकीय मोजणी होऊन अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. मात्र मोजणीला काही शेतकर्‍यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे हा रस्ता कळीचा मुद्दा ठरत आहे. ग्रामपंचायत व स्थानिक शेतकर्‍यांनी एकत्रित येवून यावर मार्ग काढण्याची मागणी परिसरातील पालकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com