पिंपळद ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार

पिंपळद ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार

पिंपळद । वार्ताहर | Pimplad

चांदवड तालुक्यातील (chandwad taluka) पिंपळद (pimplad) येथे स्वातंत्र्यदिन (independence day) मोठ्या उत्साहात साजरा झाला.

मात्र त्यानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचत प्रश्नांची सरबत्ती केल्याने सरपंच (sarpancha) व ग्रामसेवकाने (gram sevak) सभेतून काढता पाय घेतल्याने ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला.

ग्रामपंचायत (gram panchayat) कार्यालयात ध्वजारोहणानंतर (flag hoisting) सरपंच अश्विनी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. प्रारंभी ग्रामसेवक पाटील यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. यावेळी ग्रामस्थांनी मागील सभेतील काही ठरावांबद्दल विचारणा केली असता सरपंच व ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने संतप्प ग्रामस्थांनी ग्रामसभेवर बहिष्कार (Boycott) टाकला. गावातील अनेक समस्यांबाबत उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थाचा संताप अनावर झाला.

ग्रामस्थांचा संताप पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सभेतून बहिर्गमन केले तर काही सदस्यांनीही पळ काढला. ग्रामसभेत तीन ते चारच सदस्य हजर होते. स्वत: सरपंच व ग्रामसेवक निघून गेल्यामुळे भरपावसात ग्रामस्थांना ताटकळत रहावे लागले. त्यांमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी देखील ग्रामसभेवर बहिष्कार टाकला

सर्वांची पदे रद्द करण्याबाबत पं.स. गटविकास अधिकारी (Group Development Officer), तहसीलदार (tahsildar) व जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) वरिष्ठ अधिकार्‍यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन (memorandum) देण्यात आले. ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) उघड होण्याची चर्चा होत असून संबंधितांची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com