Nashik : अंगावर दगड पडल्याने यात्रेकरूचा मृत्यू

Nashik : अंगावर दगड पडल्याने यात्रेकरूचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

ब्रह्मगिरीवर (Brahmagiri) दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूचा (Pilgrims) अंगावर दगड (Stone) पडल्याने मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास अश्रू आरडे (वय ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयत आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्यामुळे त्यांच्या हातपाय आणि डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Nashik : अंगावर दगड पडल्याने यात्रेकरूचा मृत्यू
'त्या' याचिकेवर राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

तसेच या घटनेची माहिती तात्काळ त्र्यंबक पोलिसांना (Police) दिली असता त्यांनी घटनास्थळी दाखल होत ब्रह्मगिरीवरून डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार लगत आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबक राजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेने मृतदेह खाली आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून आरडे यास मृत घोषित केले.

Nashik : अंगावर दगड पडल्याने यात्रेकरूचा मृत्यू
मोठी बातमी! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार - शरद पवार

दरम्यान, याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात (Trimbak Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ब्रह्मगिरीवरून डोलीवाल्यांना मृतदेह खाली आणण्यासाठी पोलीस पाटील किसन झोले व तपासी हवालदार सतीश मोरे यांनी सहकार्य केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com