मांजात अडकलेल्या कबुतराला पोलिसांनी दिले जीवदान

मांजात अडकलेल्या कबुतराला पोलिसांनी दिले जीवदान

इंदिरानगर | वार्ताहर

पतंगाच्या मांजामध्ये अडकलेल्या कबुतराला नाकाबंदी वरील पोलिसांनी त्वरित प्राथमिक औषध उपचार करून मांजा मधून कबुतराची सुटका करत जीवदान दिले.

या घटनेनंतर परिसरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे. याबाबत माहिती अशी की, वडाळा रस्त्यालगत नाकाबंदी वरील पोलीस हवालदार विवेकानंद पाठक यांना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एका नागरिकाने मांजामध्ये खबुतर अडकून पडलेले असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांनी व ड्युटीवरील पोलीस नाईक वरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांनी त्वरित कबुतराची मांजातून सुटका केली.

तसेच मांजामुळे मानेला व पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. त्यांनी कबुतरावर प्राथमिक औषध उपचार करत पक्षीमित्र उमेश नागरे यांच्याकडे सुपूर्द केले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पक्ष्याला जीवदान मिळाल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com