वर्‍हाड पिकअपला अपघात; 31 जखमी

वर्‍हाड पिकअपला अपघात; 31 जखमी

वांगणसुळे । वार्ताहर | Vangansule

हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणार्‍या पिकअप जीपला अपघात (accident) होऊन 31 जण जखमी झाल्याची घटना साडेचारच्या दरम्यान उंबरठाण - वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली.

रगतविहिर पैकी फणसपाडा येथील वर्‍हाडी मंडळी पिकअप (Pickup) ( एमएच 15 पी 3504) ने हळदीच्या कार्यक्रमासाठी हातरुंडी येथे गेली होती. हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असतांना सोनगीर फाट्याजवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले (vehicle overturned) झाले. यामध्ये 31 जण जखमी झाले होते. यामध्ये डोक्याला, हातापायांंना, छातीला मार लागला होता. जखमींना तत्काळ पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकारी मिथिलेश अहिरे, कोमल वागलगाते, मेघा पारखे, कर्मचारी पावरा, बागुल, गौरव उशिर, विश्वास पाडवी, कपिल केंग यांनी जखमींवर उपचार केले. अपघातातील 9 जखमींना गुजरात मधील वासदा गुजरात येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर 3 जखमींना खासगी रुग्णालयात व 5 जखमींना बलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार जे. पी. गावित, माजी सभापती रामजी गावित, विजय घांगळे, रमेश वाडेकर, तुळशीराम महाले वारसा येथील दिनेश शर्मा, राकेश शर्मा, दिपक शर्मा यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांंची विचारपूस केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com