कुमार चौधरी यांना निरोप देतांना कर्मचारी गहिवरले

अधिकाऱ्यांसह सेवकांनी केली पुष्पवृष्टी
कुमार चौधरी यांना निरोप देतांना कर्मचारी गहिवरले

नवीन नाशिक प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. पदभार सोडत असतांना अधिकाऱ्यांसह सेवकांनी त्यांच्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप दिला.

वपोनी कुमार चौधरी यांनी १ डिसेंबर २०२० रोजी अंबड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. जवळपास या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात विविध उपक्रम राबविले.त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह सेवकांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रमामुळे सर्वांशीच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. आज ( दि. २६ ) त्यांनी आपला पदभार नवनिर्वाचित वपोनी भगीरथ देशमुख यांना सोपविला.

यावेळी पोलीस ठाण्यातून जात असतांना अधिकाऱ्यांसह सेवकांनी पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप दिला. यावेळी चौधरी यांच्यासह सर्वच जण भावूक झाले होते. यावेळी सपोनी गणेश शिंदे , उपनिरीक्षक हरिसिंग पावरा,संदीप पवार,किरण शेवाळे,नाईद शेख,अंमलदार संजय जाधव,प्रमोद काशीद,आप्पा गवळी,प्रशांत नागरे,मुरली जाधव,कैलास निंबेकर,अशोक आव्हाड,सचिन सोनवणे,रोहिणी उगले,अश्विनी भोसले,मिनल रहाणे ,अविनाश चव्हाण, मछिंद्र वाकचौरे,अनिल गाढवे,अनिल ढेरंगे,धनराज बागुल, पवन परदेशी, दीपक निकम,नितीन सानप,अनिरुध्द येवले,नितीन फुलमाळी,दिनेश नेहे, मनोहर कोळी,सूचित सोळुंके बार्शिले, विसपुते आदींसह पोलीस अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com