नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

देशभरात कोरोना प्रतिबंधीक लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.या लसीकरणानंतर मात्र शनिवारी लस घेतल्यानंतर महापािलिकेच्या 12 कर्मचार्यांना अंगाला खाज येणे, ताप येणे, डोके दुखी, सांधेदुखी, उलटी, मळमळ असा सौम्य स्वरूपाचा त्रास झाला. मात्र या सर्वांची त्यांची प्रकृती ठिकठाक असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

शहरात गेल्या 15 जानेवारी रोजी कोविशिल्ड या लसीकरणास प्रारंभ झाला असुन 3 केंद्रातून हे लसीकरण केले जात आहे. यात नाशिकरोड परिसरातील बिटको व नवीन बिटको रुग्णालय व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय अशा तीन केंद्रांचा समावेश आहे. एका केंद्रात शंभर कर्मचार्या यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी मनपाच्या आरोग्य विभागातील 300 कर्मचार्यांपैकी 127 कर्मचार्यांचे लस देण्यात आली.

या कर्मचार्यांपैकी 12 जणांना लस दिल्यानंतर किरकोळ त्रास झाला. त्यात अंगाला खाज येणे, ताप येणे, डोके दुखणे, सांधी दुखी, उलटी, मळमळ यासारखा त्रास झाला, असे असले तरी त्यांची प्रकृती ठिकठाक आहे. असे असले तरी याबाबत कर्मचार्यांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासा वैद्यकिय अधिकार्यांनी दिला आहे.

पहिल्या दिवशी मनपाचे 173 कर्मचारी लसीकरणाच्या वेळेस अनुपस्थित राहिले. संबंधीत 173 कर्मचार्यांना पुन्हा दोन वेळेस संधी देण्यात येणार आहे. त्यावेळेस त्यांनी लस न घेतल्यास त्यांचे नाव यादीतून कमी होणार आहे. अनुपस्थित राहिलेल्या 173 पैकी काही कर्मचारी बाहेरगावी तर काही कर्मचारी अन्य कामामुळे लस घेऊ शकले नाही. अशा कर्मचार्यांची नावे पुन्हा अॅपमध्ये येणार असून, अॅपद्वारे त्यांना सूचनाही मिळू शकणार आहे.