Photo Gallery : पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे पाहा 'इथे'

Photo Gallery : पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे पाहा 'इथे'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस उपनिरीक्षकांच्या (PSI) १२१ वा दिक्षांत सोहळा आज महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) पार पडला. यात १६० पुरुष व ११ महिला असे १७१ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल झाले आहे...

यावेळी सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने राजु विष्णु सांगळे (Raju Vishnu Sangle) या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. तसेच अहिल्यादेवी होळकर कप वेस्ट ऑल राऊड वुमन कॅडेट इन द बॅच या पुरस्काराच्या मानकरी उर्मिला जालिंदर खोत (Urmila Khot) यांना गौरवण्यात आले. तसेच सुजित सुरेंद्र पाटील (Sujit Patil) यांस द्वितीय सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन सन्मानित करण्यात आले.

पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी सांगितले की, आजपर्यंतचा पोलीस (Police) खात्यातील अनुभव व गेल्या दहा महिन्यांतील प्रशिक्षण यांची सांगड घालून महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याचे मत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रजनिश सेठ (Rajnish Seth) यांनी व्यक्त केले.

Photo Gallery : पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे पाहा 'इथे'
Video : १७१ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल; पाहा दैदिप्यमान सोहळा

कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस महासंचालक, (प्रशिक्षण व खास पथके), संजय कुमार, संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक राजेश कुमार, उपसंचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक गिरीष सरदेशपांडे, उपसंचालक (प्रशिक्षण) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक गौरव सिंग, पोलीस आयुक्त नाशिक शहर जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ. बी. जी. शेखर, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण सचिन पाटील आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com