Photo Gallery: पाऊले चालू लागली पंढरीची वाट; माझे जीवाची आवडी नेईन पंढरपुरा गुढी

Photo Gallery: पाऊले चालू लागली पंढरीची वाट; माझे जीवाची आवडी नेईन पंढरपुरा गुढी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

माझे जीवाची आवडी नेईन पंढरपुरा गुढी असे म्हणत तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वारकऱ्यांनी भरगच्च भरलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीतून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे निघाली....

पांडुरंगा तुझी दोन वर्षे भेट झाली नाही. आता पायी वारिने तुझ्या भेटी साठी निघालो आहे.अशी दृढ भावना व्यक्त करीत वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे जाण्यासाठी पडू लागली आहेत.

'सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या हात' असा अभंग म्हणत संत निवृत्तीनाथ मंदिरात आरती करून रथ मंदिरापासून पालखीचे प्रस्थान झाले. सन 2016 मध्ये एक कोटी रुपये खर्चून निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ तयार करण्यात आला आहे. सजवलेल्या रथात संत निवृत्तीनाथांची मूर्ती पालखी आणि पादुका आहेत.

Photo Gallery: पाऊले चालू लागली पंढरीची वाट; माझे जीवाची आवडी नेईन पंढरपुरा गुढी
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान; असा आहे पालखीचा प्रवास

हजारो वारकरी मान्यवर कीर्तनकार दिंडीचे मानाचे दिंडेकरी विणेकरी पायी वाटचाल करीत आहे. मंदिराचे पुजारी जयंत महाराज गोसावी प्रशासन समितीचे भाऊसाहेब गंभीरे,दिंडी चालक बेलापूरकर महाराज डावरे महाराज यांनी पालखीचे पूजन करीत दर्शन घेतले.

कुशावर्त (Kushavart) नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर (Purushottam Purushottam Lohgaonkar) यांनी सपत्नीक केली. या सहकारी नगरसेवक सामील होते. 12 च्या सुमारास पालखी लक्ष्मीनारायण चौकातून पुढे आली.10 हजार वारकरी सामील होते.तर 25 हजार भाविक नागरिक पालखीला निरोप देणे साठी मुख्य नाक्यावर संत गजानन महाराज मंदिर (Gajanan Maharaj Temple) येथे उपस्थित होते.

विविध मंडळांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबक मंदिरात देव भेट झाली.साडे बाराच्या सुमारास पालखी नाशिक मार्गावर प्रस्थान झाली. मोठ्या संख्येने वारकरी महिला सामील होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com