
नाशिक | प्रतिनिधी Nashik
जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियोजित केल्या जाणार्या विविध कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर आहे. शहर पोलिसांकडून याबाबत विशेष नियोजन केले आहे, या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला होता.
नववर्षांच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून अधिकारी, 40 अंमलदारांसह 30 होमगार्ड यांचे कडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला . वेगाने वाहने चालवणारे रायडर पोलिसांच्या विशेष टारगेटवर होते. बार परमिट रूम सुरू राहणार असल्याने मद्यपी आणि अती उत्साही होऊन वाहन चालविणे, भांडण करणे यासह नागरिकांशी वादावर पोलिसांचा विशेष लक्ष आहे. ठिकठीकाणी नाकाबंदी, बॅॅरीकेडस लाऊन वाहन धारकांची चौकशी करण्यात येत असल्याचे दिसून आले.