खड्ड्यामुळे पेट्रोल टँकर पलटी

खड्ड्यामुळे पेट्रोल टँकर पलटी

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

बारा हजार लिटर पेट्रोल (Petrol) घेऊन जाणारा टँकर (tanker) खड्ड्यामुळे (potholes) चालकाचे नियंत्रण सुटून पलटी झाल्याची घटना मनमाड-नांदगाव मार्गावर (Manmad-Nandgaon road) घडली. तीव्र तापमान (Temperature) अंग भाजून काढत असतांना पलटी झालेल्या टँकरमधून इंधनाची गळती (Fuel leak) सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह (Fire brigade) पेट्रोलियम कंपनीच्या (Petroleum Company) अधिकार्‍यांनी धाव घेत स्थानिक नागरीकांच्या मदतीने इंधन गळती थांबविल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. इंधन गळती रोखण्यास त्वरीत यश आल्याने मोठा अनर्थ टळला. मनमाड-नांदगाव रस्त्याचे काम (road work) सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी तर आहेच शिवाय मोठं मोठे खड्डे देखील असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मनमाडपासून जवळ असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून सुमारे 12 हजार लिटर इंधन घेऊन एमएच-19-झेड-9988 हा टँकर भुसावळकडे (Bhusaval) जाण्यासाठी मार्गस्थ झाला असतांना जुन्या टोल नाक्यालगत (toll naka) रस्त्याचे काम सुरू असल्याने खडींसह असलेल्या खड्ड्यामुळे (potholes) चालकाचे नियत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला.

रस्त्यावर पलटी झालेल्या टँकरमधून पेट्रोल (petrol) गळती सुरु झाली होती. अगोदरच कडक उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे टँकरमधून पेट्रोलची गळती होत होती. पेट्रोल अंत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आग लागण्याची शक्यता होती त्यामुळे मनमाड-नांदगावकडे येणारी-जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले.

कंपनीचे अधिकारी योगेश अथर्डे, रोशन टीवलेकर, रावजी काखट, शंकर भाबड यांनी स्थानिक नागरिक अशोक गीते, विजू काळे, अभय महाले, विजू काळे, साहेबराव दराडे, सोमनाथ गीते, संतोष नागरे, भाऊराव गीते, दत्तू पवार, मच्छिंद्र वाघ, पप्पू कांदळकर, गणेश थोरे, कमलेश पहेलवान, योगेश अथर्डे, रोशन टीवलेकर, रावजी काखट, शंकर भाबड, अशोक गीते, विजू काळे, अभय महाले यांच्या मदतीने अगोदर टँकर मधून होणारी इंधन गळती थांबवली त्यांनतर रस्त्यावर पलटी झालेला पेट्रोल टँकर क्रेन आणून सरळ केला.

या घटनेत मोठ्या प्रमाणात इधन वाया गेले शिवाय टँकरचे देखील मोठे नुकसान झाले.सध्या मनमाड-नांदगाव रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असून खडी,खड्डे यामुळे रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करण्यात यावे किमान रस्त्यावर पसरलेली खडी बाजुला करण्यासह रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहन चालकांसह परिसरातील नागरीकांतर्फे केली जात आहे.

Related Stories

No stories found.