बापरे! लॉकडाऊन काळात पेट्रोल विक्रीत 'इतकी' घट
पेट्रोल

बापरे! लॉकडाऊन काळात पेट्रोल विक्रीत 'इतकी' घट

पंपचालक अडचणीत; कर्मचारीही गोत्यात

सातपूर | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने लॉकडाऊन लागू केल्याने अन्य व्यावसायिकांप्रमाणेच पेट्रोलपंप व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या विक्रीत सुमारे ७० टक्के घट झाली असल्याने पेट्रोल पंप चालक व कर्मचारी अडचणीत सापडलेले आहेत...

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर, सुरुवातीच्या काळात पेट्रोल पंपाना निर्बंधांतून शिथिलता होती. मात्र, ग्राहकच घराबाहेर पडत नसल्याने व्यावसायिकांना जवळपास ५० टक्के फटका बसला होता, परंतु गेल्या १२ मेपासून जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

शासनाच्या निर्बंधांनुसार, केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल डिझेल विक्रीस सवलत देण्यात आली होती. तरी प्रत्यक्षात शहरात सामान्य परिस्थितीत जवळपास ११ ते १२ हजार लीटर पेट्रोल-डिझेलची विक्री करणाऱ्या पंपांची सध्या केवळ दोन ते अडीच हजार लीटरपर्यंत विक्री होत आहे. विक्रीत घट झाल्याने पेट्रोलपंप चालकांना कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्च भागवणे कठीण झाले आहे.

पेट्रोल विक्री कमी झाल्याचे दुःख नाही, पण आपला जिल्हा, राज्य करोनातून मुक्त व्हावे, हीच व्यावसायिकांची इच्छा आहे. कडक निबंधांच्या काळात नियमांवर बोट ठेवणारे प्रशासन आणि आग्रही व आक्रमक ग्राहक यांच्या कात्रीत पंपचालक सापडले आहेत.

विजय ठाकरे, उपाध्यक्ष, राज्य पेट्रोल डीलर्स संघटना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com