Video : विनाहेल्मेट पेट्रोल दिले नाही; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Video : विनाहेल्मेट पेट्रोल दिले नाही; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात गेल्या चार दिवसांपासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून नो हेल्मेट नो पेट्रोल (No helmet no petrol Campaign) मोहीम राबवली जात आहे. काल (दि १८) रोजी म्हसरूळ (Mhasrul) परिसरातील एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) विनाहेल्मेट पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला (Petrol Pump worker beaten by without helmet wear man) मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले असून पोलीस कर्मचारी नसल्याने हा प्रकार झाल्याचे समजते आहे....

काल (दि १८) रोजी म्हसरूळ (Mhasrul) येथील इच्छामणी पेट्रोल पंपावर (Ichhamani Petrol Pump) एक व्यक्ती विना हेल्मेट पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. दरम्यान, हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही असे बोर्डही याठिकाणी लागले होते. परंतु पेट्रोल द्यावे अशी दमबाजी या व्यक्तीने केली. दरम्यान, कर्मचाऱ्याने पोलिसांनी घालून दिलेल्या नियमानुसार पेट्रोल देता येणार नाही असे सांगितले.

याचा राग आल्यामुळे या व्यक्तीने थेट पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला (Petrol Pump Worker) मारहाण केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनला (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार आहे. घटना घडली त्यावेळी पोलीस बंदोबस्त याप्रसंगी नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे समजते. पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com