
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या नव्या निर्णयानुसार विनाहेल्मेट धारकांना पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल दिल्यास त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा का दाखल करून नये अशी नोटी बजावण्याबाबत इशारा दिला आहे....
दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात आज दिवसभर नाशिक पेट्रोल डीलर असोसिएशनकडून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल पंप बंद बाबत आधीच घोषणा केल्यामुळे कालच (दि ०१) रात्री उशीरापर्यंत अनेक नागरिकांनी इंधनाच्या टाक्या भरून ठेवल्या. दुसरीकडे आज अनेक अस्थापना बंददेखील आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप बंदचा फारसा परिणाम नागरिकांवर झालेला दिसून आला नाही.
दुसरीकडे, शहरातील चार पेट्रोल पंप सुरु ठेवण्यात आले आहेत. येथील पेट्रोलपंपांवरदेखील आमच्या प्रतिनिधींनी परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा सकाळच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात गर्दी होती मात्र दुपारी नेहमीप्रमाणे शुकशुकाट दिसून आला.
एकूणच आज पेट्रोल बंद असले तरी सोशल मीडियात अनेकांनी सुरु असलेल्या चार पंपांची नावे शेअर केली. त्यामुळे घराबाहेर न पडण्याच्या विचारात असलेल्या अनेकांनी गाडीवर स्वार होत गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागात फेरफटका मारला.
यासोबतच पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने अनेकांनी हेल्मेट परिधान केलेले दिसून आले. डबल शीट प्रवास करणाऱ्यांनीही पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हेल्मेट सोबत बाळगल्याचे दिसून आले.