पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व खंताच्या किमंती कमी करा

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व खंताच्या किमंती कमी करा

येवला | प्रतिनिधी

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात करोना महामारी संकट सुरु असतांना केंद्र सरकार कडुन दररोज पेट्रोल डिझेलच्या किमंती वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व खंतांच्या भरमसाठ प्रामाणात वाढविलेल्या किमंती कमी कराव्यात, अशी मागणी आखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केंद्र सरकार व राज्य सरकार कडे केली आहे...

ग्रामीण भागात पुर्व मशगतीला सुरुवात झाली आहे. ऐन खरीपाच्या हंगामाला सुरुवात होण्या आधिच केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे. शंभरीच्या जवळ पास डिझेल, पेट्रोलच्या किमती पोहोचल्या आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार थांबले आहे. खरीपाचा हंगाम सुरु होत आहे.

तोच खंतच्या किमंती भरमसाट वाढविल्या आहे. करोनामुळे सर्व लोकांची आर्थीक परिस्थिती प्रचंड प्रमाणात ढासळललेली आसतांना सर्व सामन्य, शेतकरी, शेतमजुर, कामगार याना रोजगार उपलब्ध नसतांना खाद्यतेलाच्या किमंतीही मोठया प्रमाणात वाढल्या आहे. गॅसच्या किमती वाढल्याने सर्वाचे कबंरडे मोडले आहे.

कॉग्रेसच्या कार्य काळाच्या केंद्रात व राज्यात सरकार असंतांना पेट्रोल व डिझेल गॅस खाद्यतेल, खते यांच्या किमती जर वाढल्या असतील तर ताबडतोब दखल घेतली जात होती. आज तर आसे वाटत आहे की केंद्र सरकार हे राम भरोसे चालु आहे. या सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या किमतीवर दखल घेतली जात नाही, असे दिसत आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी एकिकडे शेतकर्‍याना पी. एम. योजनेचे दोन हजार रुपये देतात, आणि दुसरी कडुन खतांच्या किमंती भारमसाठ वाढवितात हा शेतकर्‍यावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. खतांचे वाढविलेले भाव त्वरीत कमी करण्यात यावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रति केंद्रीय पेट्रोलियम मंत्री केंद्रीय, कृषिंमंत्री, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, कृषीमत्री दादा भुसे, नानासाहेब पटोले व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com