इंधरदरात मोठी वाढ; नाशिकमध्ये पेट्रोल दर गाठणार शंभरी

इंधरदरात मोठी वाढ; नाशिकमध्ये पेट्रोल दर गाठणार शंभरी

नाशिक | प्रतिनिधी

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात स्थिर असलेले इंधनाचे दर निकालानंतर दररोज वाढत चालले असून, त्यांची वाटचाल पुन्हा शंभरीच्या दिशेने सुरू झाली आहे. एप्रिल महिन्यात स्थिरावलेले इंधनाचे दरांची पुन्हा दरवाढीची वाटचाल वेगाने सुरू केल्याने सामान्य नागरीक मात्र चिंतित झाल्याचे चित्र आहे...

गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या इंधन दरवाढीचा आलेख चढताच आहे. आठ दिवसांत तब्बल सहा वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. बुधवारी (दि. १२) पेट्रोलच्या दरात २४ पैशांची वाढ होऊन ते ९८.८६ रुपयांवर पोहोचले, तर डिझेलचे दरही २६ पैशांनी वाढून ८८.८६ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले.

एप्रिल महिन्यात निवडणुका असल्यामुळे इंधनदरात काही काळ किरकोळ घसरण झाली होती. मात्र, ४ मे पासून आठ दिवसांत इंधनदर सतत चढतेच आहेत.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त केल्यामुळे आता किमती ठरविण्याचा अधिकार पेट्रोलियम कंपन्यांना आहे. त्यामुळे कंपन्या रोज या दोन्ही इंधनाच्या किमती जाहीर करतात. परिणामी, इंधनदर सातत्याने बदलते असतात. ४ ते १२ मेपर्यंतच्या ८ दिवसांत तब्बल ६ वेळा इंधनदर वाढले आहेत. या आठ दिवसांत पेट्रोल १ रुपया ४४ पैशांनी, तर डिझेल १ रुपया ७६ पैशांनी वधारले आहेत.

मागिल करोना साथरोगाच्या काळातही दर वाढलेले होते. भरघोस नफा कमावणाऱ्या सरकारी तेल विपणन कंपन्या आणि या कंपन्यांकडून लाभांश रूपाने केंद्र सरकारच्या तिजोरीत पडणारी मोठी भर, असे चित्र असतानाही सामान्य नागरिकांना मात्र दिवसेंदिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. हे अन्यायकारक आहे.

- सिताराम ठोंबरे (जिल्हाध्यक्ष सिटू)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com